छत्रपति शिवाजी महाराजांस मानाचा मुजरा

Wednesday, April 28, 2010

शिवबा म्हणजे पवित्रता ,शिवबा म्हणजे सुन्दरता
शिवबा म्हणजे संपन्नता , शिवबा म्हणजे साहस
शिवबा म्हणजे स्वातंत्र , शिवबा म्हणजे खास
शिवबा म्हणजे एकी ,शिवबा म्हणजे नेकी
शिवबा म्हणजे श्वास , शिवबा म्हणजे ध्यास
शिवबा म्हणजे विश्वास , शिवबा म्हणजे पापाचा नाश
शिवबा म्हणजे स्वराज्य ,शिवबा आयुष्याचा भाग आविभाज्य
शिवबा म्हणजे चातुर्य , शिवबा म्हणजे धगधगती आग
शिवबा म्हणजे वाष्यल , शिवबा म्हणजे नविन जाग
शिवबा म्हणजे गरिबांचा वाली , शिवबा म्हणजे शेतकर्यांच्या शाली
शिवबा म्हणजे जतिपातिंचा रास् , शिवबा म्हणजे स्वराज्याचा ध्यास
शिवबा म्हणजे प्रेरणा , शिवबा म्हणजे भावना ,
शिवबा म्हणजे जीवन गीत , शिवबा म्हणजे जीवन संगीत

Monday, April 5, 2010

People who sing and dance in a procession organised to celebrate the birth anniversary of Shivaji Maharaj will never understand his importance. However the one who puts in efforts like him will be able perceive his greatness and surrender at his feet!

- H.H. Dr. Jayant Athavale
Chhatrapati Shivaji Maharaj is the principle of effulgence or rather he is the divine inspiration. He is certainly not human. In fact he is a Primal God who took birth in a divine and pure culture.

Sunday, April 4, 2010

"जेव्हा जेव्हा पण या पृथ्वीवर पाप वाढत गेल तेव्हा तेव्हा देवाला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला" अस गीतेत लिहिले आहे; या नियमा नुसार "जिजायु माँ साहेबांच्या पोटी शिव अवतार झाला".
जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्‍नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.

शहाजीराजे
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

जिजाबाई
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी दादोजी कोंडदेव[ संदर्भ हवा ] ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली.

मार्गदर्शक
लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते. समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.

Saturday, April 3, 2010

Posted by Picasa
हा ब्लॉग लिहिण्यास कारण की; महाराष्ट्रातील किंव्हा भारतातील काही राजकीय किंव्हा धर्माच्या नावाखाली आपली दुकाने चलवानारया काही भोंदू लोकांनि "छत्रपति शिवाजी महाराज" हे नाव फक्त एका राष्ट्रपुरते किंव्हा एका धर्मा पुरते मर्यादित ठेवले आहे. खरेतर राजे हे युग पुरुष होते. त्यांच्या मनामधे कधीच इतर धर्माबद्दल आकास नव्हता. शेवटपर्यंत अन्यायकारक, जुल्मी राजवटीनविरुद्ध लढले पण कधी त्यांच्या धर्मावर घाला घातला नाही. त्यांना सुधा आपली रयत मानून आईच्या मायेने संभाल केला.
मी काही मोठा विचारवंत नाही किंवा टीकाकार ही नाही मला जे छत्रपति बदल वाटते' त्यांच्या एकून चरित्रावारून जे काही मला जानावल ते मी ईथे नमूद करत आहे.