Thursday, January 13, 2011
छत्रपति संभाजी महाराज
गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.
पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.
अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला "हिंदू राजास" हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.
कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.
दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!
स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....!!!
(संदर्भ:- संभाजी कादंबरीतून)
शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही.
पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय. त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो.
ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी" या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्यात लावण्यास मज्जाव होतो.
ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला. आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना.
इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो, मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात. यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली.
अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....
कसाब जिवंत पकडला, त्याला अनेकांनी आँखो-देखे पाहिले. पत्रकारांनी बातम्यांमध्ये, दूरदर्शनवर तमाम जनतेस त्याचे काळेकृत्य दाखवले...आम्ही मिटक्या मारीत पाहिलेही ...तरी सूद्धा आम्ही कोर्टात दावेच चालवतोय......,
आणि फार-फार तर काय आमच्या काही सच्च्या, निर्भिड, उज्वल वकिलांमार्फत फाशीची शिक्षा झालीच तर हा सुद्धा आमच्या "हिजडया- राजकर्त्यांच्या" कुशीत बसून त्या आदम अफझल गुरू सोबत बिर्यानीची लज्जत घेणार.....
आणि फाशीच्या शिक्षेनंतरही आमचीच जनता आमच्याच कायद्याला ताठ मानेन आव्हान करतात.
"फाशीची शिक्षा देणार्या न्यायाधीशांचे खून पडतील"
- फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर.
"भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधींसारख्या शांति दुताच्या देशात फाशीची शिक्षा असावी यापेक्षा दुर्भाग्य ते कोणते.......?
त्याना फाशी ऐवजी, हवी तर जन्मठेप द्या.....".......हवी तर......?..... ..म्हणजे नक्की काय.......?
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, तारिक आन्वर.
यांसारखे अनेक धर्ममिंधे आज आमच्याच घरचे वासे मोजतायत्....आपल्याच मातृभुमीच्या कलेजाची लक्तर तोडतायत्....
जे या दहशतवादी हल्ल्यात "शहीद" झाले, आज त्यांच्या चुलीत आग नाही..... याचे यांना काही सोयर-सुतक आहे का......?
आणि दुसर्या बाजूला "साध्वी ऋतुंबरा" प्रकरणात कटाक्ष टाकलात तर तिचा गुन्हा.......?
.......गुन्हा सिध्द होण्याअगोदरच तिचा किती मानसिक आणि शारारीक छळ केला गेला.......तिचे जिणे मुश्कील केले गेले....
आम्ही मानतो.......गुन्हा हा शेवटी गुन्हाच आहे....त्यात कोणतीच कैफियात नाही.....पण.......
मग...."एकाला दूधभात आणि एकाला ताकभात का....?"
हा पक्षपात कशासाठी ....?...
का......तर तिने मूठभर अल्पसंख्यांकांच्या जनहिताला ठेच पोहचवीली...म्हणून....?
मग....आम्ही.....कोण....?......आम्हाला....भावना नाहीत....?....आमच्या भावनांचा उद्रेक होत नाही.....?
गांधीनीही फाळणीच्या वेळेस हेच केले....आम्ही सहन करतो...म्हणजे..."तो एक सृष्टीनियमच आहे...."...असे यांचे मत....
तेंव्हा ही.... हे....हे....आपले राष्ट्रपिता मातृभूमीच्या छातीत खंजीर खुपसुन...५५ कोटी रुपये, (म्हणजे आजचे अंदाजे १४ हजार ८० कोटी रुपये) घेऊन सुईनी सारखे त्या पाकिस्तानच्या मदतीला धावुन गेले.......
याचाच आर्थ, "शंभू राजे", माफ करा आम्हाला,
आम्ही ही किती षण्ढ आहोत....?...आपली सोललेली लक्तर आम्ही सुद्धा त्याच गर्दीत उभे राहून या बेशरमी नजरेतून आणि नुसत्या पोसलेल्या देहयष्टीने पहात आहोत.
उलट आमच्यातीलच काही "हिंदु" तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही अभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत.
आम्हाला...... क्षमा करा......"राजे".........आम्हाला क्षमा करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Mitra 1 no bolalas yar..
ReplyDeleteAjkal aplya deshat Khup vait gosti ghadat ahet..
Kharokhar aj jar "SHIVAJI RAJE" kiva "SAMBHAJI RAJE" aste tr kiti Dukhi zale aste .. kon ghotala karto tr tyala Suspend karun lagech dusre khate.. are ky chalu ahe ethe.. he rajya shivarayanche ahe.. tithe hi asli manse ? kiti khedachi gost ahe.. Kahiatri karayla have yar..